युवराज सर आपले *शिकाल भाषण तर कराल शासन* हे पुस्तक वाचले, फारच भारावून गेलो, म्हणजे मला अगदी झपाट…
युवराज सर आपले *शिकाल भाषण तर कराल शासन* हे पुस्तक वाचले, फारच भारावून गेलो, म्हणजे मला अगदी झपाटल्यासारखे वाटत आहे.
युट्युब वर आपले व्हिडिओ पाहत असताना आपली बोलण्याची शैली व देहबोली ने मी अत्यंत प्रभावित झालो होतो. तुमच्याशी संपर्क साधला असता पुस्तकाबद्दल माहिती मिळाली नंतर लागलीच पुस्तक मागवले परंतु टपाल खात्याच्या काही तांत्रिक अडचणीमुळे पुस्तक मिळायला दिरंग झाला. यादरम्यान माझी अवस्था जल बिन मछली सारखी झाली होती कारण मी एक पुस्तकवेडा आहे. माझ्या मना अवस्थेचं आपणास यथार्थ आकलन होण्यासाठी मला बाबासाहेबांच्या जीवनातील एक प्रसंग येथे नमूद करावासा वाटतो.
1907 मध्ये प्राध्यापक पी लक्ष्मी नरसु नावाच्या तामिळनाडूमधील लेखकाने *बुद्ध धम्माचा सार* नावाचे एक पुस्तक लिहिले आहे ही गोष्ट पुस्तक प्रेमी बाबासाहेबांच्या लक्षात आली, बाबासाहेबांना हे पुस्तक वाचण्याची अतीव इच्छा निर्माण झाली तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या तमाम कार्यकर्त्यांना असा आदेश दिला की हे पुस्तक जिथे कुठे मिळेल तिथून प्राप्त करावे पाठवावे त्यावेळी बाबासाहेब दिल्ली येथील अलीपुर बंगल्या मध्ये राहत होते. साक्षात बाबा साहेबांचा आदेश म्हटल्यावर ती सर्वच कार्यकर्ते कामास लागले परंतु त्यांना महाराष्ट्रात हे पुस्तक कुठेही मिळाले नाही तरी बाबासाहेबांच्या बंगाल येथील एका कार्यकर्त्याला हे पुस्तक बंगालमध्ये रद्दीच्या दुकानात मिळाले त्याने तुरंत बाबासाहेबांना दिल्लीला फोन करुन पुस्तकाबाबत माहिती दिली. बाबासाहेबांना पुस्तक वाचण्याची एवढी उत्कंठा इच्छा होती ही बाबासाहेब दिल्लीवरून बंगालला केवळ एका पुस्तकासाठी विमानाने गेले आणि जेव्हा तो व्यक्ती त्यांना पुस्तक घेऊन भेटला तेव्हा त्यांनी अक्षरशः त्याच्या हातातून पुस्तक हिसकावून घेत